FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

काकडी वेडीवाकडी होण्याची काही कारणे -

P P Pardeshi -
१. कमकुवत परागीभवन -
सध्या काकडी लागवडीत सेल्फ पॉलिनेटेड जातींचा जास्त वापर होतो तरी दररोजच्या फवारण्यामध्ये कामकाज चालू असताना खूप जवळून केलेली फवारणी फुलांमधील परागकणांना इजा पाहोचवतात. त्यामुळे सुद्धा कमकुवत परागीभवन होते. त्यासाठी फवारणी करताना कमीतकमी ४ फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे.
२. तापमानातील फरक -
कधीकधी तापमान अचानक वाढीस लागते त्यामुळे सुद्धा परागकण कमकुवत होतात किंवा मारले जातात मग अश्या वेळेस झालेले परागीभवन आपल्याला एक सारखे आकाराचे फळ देऊ शकत नाही.
खूप जास्त कमी तापमान असल्याससुद्धा काकडी वेडीवाकडी होण्यास कारणीभूत होते.
३. जमिनीतून दिलेले पाणी -
इतर वेलवर्गीय पिकांपैकी काकडी पिकाला पाण्याची गरज जास्त असते कारण काकडीमध्ये व त्याच्या वेलीत ८०% पाणी जास्त आढळते. जेव्हा आपल्याकडून पाणी कमी दिले जाते तेव्हा सुद्धा अन्नद्रव्याचा साठा पाहिजेतसा फळापर्यंत पाहोचत नाही आणि त्यामुळे फळ एकसारखे आकार न घेता वेडेवाकडे होते.
४. अन्नद्रव्य व्यवस्थापन -
गरजेपेक्षा जास्त नायट्रोजन गेल्यास (नायट्रोजन दिले नसेल तरी पाण्यातही नायट्रोजन कधी कधी जास्त असते.)
गरजेपेक्षा कमी पोटॅश, कॅल्शियम असल्यास काकडी वेडीवाकडी होण्यास कारणीभूत होते.
बोरॉन व फॉस्फरसचा डायरेक्ट संबंध परागकणशी येतो, आणि ते सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यांची वेळोवेळी फावरणीसुद्धा आपण घेऊ शकतो.
5. तसेच जर सेल्फ पॉलीनेटेड जात नसेल तर आपण मधमाशी पालन करून सुद्धा आपले काकडी पीक सुधरवू शकतो.

Posted on: 12/3/2019 1:21:18 PM