FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

भाजीपाला पिकातील फुलगळ, फळगळीची कारणे / Flower or Fruit drop Problem in vegetables.

P P Pardeshi - +91- 9545045333
ढोबळी, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकातील फुलगळ किंवा फळगळीची कारणे / Flower drop or Fruit fall problems in Vegetable.
सध्या सगळीकडे फुलगळ किंवा लागलेले फळ गळून जाण्याची समस्या सगळीकडे दिसत आहे, जाणून घेऊ त्याची कारणे..
१. तापमानातील फरक ( Temperature Fluctuations) -
भाजीपाला पिके जसे ढोबळी, टोमॅटो व इतर पिकांची दिवसाच्या व रात्रीच्या तापमानाची आवश्यक लागणारी रेंज जवळपास ठरलेली असते, जसे दिवसाचे तापमान २१ ते २८ डिग्री व रात्रीचे तापमान १५ ते २३ डिग्री या पिकांना पोषक असते आणि जर दिवसाचे तापमान ३४ ते ४० च्या आसपास गेले किंवा ४० डिग्री च्या हि वर गेले आणि कधी रात्रीचे तापमान १० ते १५ डिग्री च्या खाली जरी गेले असता असता झाड स्ट्रेस मध्ये येऊन फुल किंवा फळगळ करते व स्वतःचा या तापमानात बचाव करते.
२. आद्रता आणि परागीभवन यांचा संबंध (Humidity) -
ढोबळी व इतर पिकांमध्ये आद्रता ३५ ते ७०% जर असेल तर या पिकामध्ये परागीभवन पूर्णपणे योग्य रीतीने पार पाडते पण जर या पेक्षा कमी किंवा जास्त आद्रता झाली असता परागकण तग धरू शकत नाही, परिणामी फुलगळ होण्यास सुरवात होते.
३. कमकुवत परागीभवन (Poor Pollination) -
जरी सर्व परिस्तिथी चांगल्या असतील आणि तरी फुलगळ होत असेल तर त्याला कारणीभूत कमकुवत परागीभवन असते, ते असे कि जरी एखादी वेलवर्गीय पिकाची जात स्वतःचे फळ सेट स्वतः करत असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन करत असेल पण जर आपल्या पॉलिहाऊस मध्ये हवा खेळती नसेल किंवा उमलेल्या फुलांना कुठल्याही प्रकारचा धक्का जर लागत नसेल म्हणजे थोडक्यात फुल हवा पाणी किडीच्या उडण्याच्या धक्क्यामुळे व्हायब्रेशन जर झाले नाही तरी नर परागकण पूर्णपणे मादा स्टिग्मा पर्यंत पाहोचत नाही परिणामी फुलगळ होते.
४. कमी किंवा अतिरिक्त नायट्रोजन (Nitrogen) -
गरजेपेक्षा कमी नायट्रोजन असल्यास खुरटे झाड तयार होते व फळधारणा होत नाही किंवा गरजेपेक्षा जास्त नायट्रोजन असल्यास शाखीय वाढ किंवा स्वतःचे पाने, शेंडेवाढीकडे झाडाचा जास्त कल जातो परिणामी झाड फळधारणेकडे विशेष लक्ष देत नाही.
५. फॉस्फरस, कॅल्शिअम, बोरॉन ची पहिल्या ३५ दिवसातील उपलब्धता (P, Ca, B availability) -
फॉस्फरस, कॅल्शिअम, बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सुद्धा फळधारणा होत नाही व फुलगळ होते.
६. कमी किंवा अतिरिक्त पाणी (Moisture in Soil) -
कमी किंवा जास्त पाणी परिस्थितीमध्ये झाड स्ट्रेस मध्ये जाते व फुलगळ करते, म्हणून आपल्या बेडमधील वरील २ ते ३ इंच मातीचा भाग कोरडा झाल्याशिवाय पाणी देऊच नये. किंवा दररोज कोणाला फोन करून विचारून पाणी देण्यापेक्षा गरजेनुसारच स्वतः परिस्तिथी बघून पाणी देणे गरजेचे आहे.

Posted on: 9/3/2019 12:13:21 PM