FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

टोमॅटो पिकातील पाने वरच्या दिशेला वळण्याची अडचण / Tomato leaves Curling Problem

P P Pardeshi -
सध्याच्या वातावरणात जवळपास ८० ते ९०% टोमॅटो शेतकरी हे स्वतःच्या प्लॉट चे फोटो सगळीकडे टाकत आहेत कि ज्यामध्ये पाऊस उघडल्यानंतर किंवा आहे त्या परिस्तिथीत टोमॅटो पिकाची जवळपास सर्व पाने अचानक वरच्या दिशेला वळायला किंवा गोळा व्हायला लागतात आणि मग त्यावर भरामसाठ लोक काही ना काही सजेस्ट करतात आणि मग आपण ते वापरतो आणि खर्च वाढतच जातो, पण सगळ्यात महत्वाचे कि तसे अचानक का होत आहे ? का बर डोलदार दिसणारे माझे टोमॅटो पीक अचानक गोळा व्हायला लागले आणि कारण समजल्यास त्यावरच आपण काम केले आहे का ??
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर -
जेव्हा वातावरणात बदल होतो म्हणजे थोडक्यात अचानक ऊन किंवा अचानक पाऊस, थंडी
पिकाच्या गरजेपेक्षा पिकाला कमी पाण्याची आणि त्या सोबत कमी अन्नद्रव्यांची उपलब्धता..
कधी कधी नैट्रोजन ची विशारता..
एखाद्या किडीचा किंवा रोगाचा प्राधुरभाव..
मुळांना वॉटर लॉगिंग मुळे होणाऱ्या जखमा, एकसारखं पाणी जमिनीत तग धरून राहणे..
अन्नद्रव्यांची उपलब्धतेपेक्षा जास्त सेटिंग होणे (आपल्या वेगवेगळ्या फवारणींमुळे) आणि त्यामुळे आलेली स्ट्रेस ..
वरील सर्व कारणांमुळे मग झाडच स्वतःची काळजी घेते आणि शक्य तेवढेच फुल आणि फळे सेट करणे इतर गाळून टाकने आणि पाण्याचा आणि त्यासोबत अन्नद्रव्यांचा ह्रास होऊ नये असा प्रयत्न करणे अश्या वेळेस पान गोळा झालेले दिसतात.

काय केले पाहिजे ??
पाणी कमी असल्यास योग्य प्रमाणात पाणी देणे
पाणी जास्त असल्यास निचरा होईल यांचा प्रयत्न करणे किंवा उंच बेडवर लागवड करणे
पावसाळी वातावरणात किंवा खूप जास्त ऊन असल्यास झाडांमधील अन्नद्रव्य बनवायची आणि अन्नद्रव्य उचलण्याची प्रक्रिया मंदावते मग त्यामुळे शक्यतो Foliar Application म्हणजे फवारणीतून खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देणे खूप गरजेचे आहे.
त्या सोबत गरज असल्यास कीटकनाशक घेतले तरी चालेल.

Posted on: 8/7/2019 2:22:38 PM