FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

भाजीपाला पिकावरील कॉलर रॉट / Collar Rot of Tomato & Vegetables.

P P Pardeshi - भाजीपाला पिकावरील कॉलर रॉट -
कॉलर रॉट ची समस्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला लागवडीच्या वेळेस, पहिले एक ते दोन खुडे झाल्यानंतर येत आहे, त्यावर भरमसाट बुरशीनाशके, औषधें ड्रेंचिंग करणे, खोड धुणे, मग कधी व्हरायटी ला दोष देणे तर कधी एखाद्या व्यक्तीच्या वापरलेल्या शेड्युलला दोष देणे असे चालू असते, पण सर्वात महत्वाचे जर आपल्याला कॉलर रॉट येण्याची कारणे समजली आणि मग आपण तो येऊ नये म्हणून काम केले तर बरे होईल.
कॉलर रॉट ची लागण हि आपण पाहिलेल्या अर्ली ब्लाइट च्या फंगल पॅथोजन अल्टरनेरिया मुळेच होते. अर्ली ब्लाइट म्हणजे सुरवातीच्या करप्याचे डाग हे आपल्याला पानावर दिसून येतात, तर कॉलर रॉट ची सुरवात आपल्याला खोडाच्या सुरवातीला गडद तपकिरी आकार नसलेल्या डंगने दिसून येते, काही काळानंतर त्या डागांचा आकार वाढतो आणि जवळपास २ इंच ते ५ इंच आकार वाढल्यावर त्या खोडाचा अन्नपुरवठा थांबतो आणि झाड किंवा रोप मरण पावते. ह्याला आपण सडवा, खोड कूज इतर काही नावाने संभोदत असतो.

अल्टरनेरिया पॅथोजनला कॉलर रॉट लागण करण्यासाठी आवश्यक परिस्तिथी -
एकसारखा ओलावा, खूप जास्त हुमिडिटी ( आद्रता ) , वातावरणात एकसारखी ऊब असल्यास, तापमान २३ ते २८ असल्यास, दिवस छोटे व रात्र मोठी असल्यास, पिकाच्या अंगावर रात्रीसुद्धा ओलावा असल्यास
नर्सरींमध्ये कॉलर रॉटची लागण होण्याची कारणे -
बी टाकल्यापासून ते रोप नर्सरीबाहेर पडण्यापर्यंत कोकोपीट ओलेच राहिल्यास..
नर्सरी मध्ये कोकोपीटमधील रोपांना सुरवातीपासून खूप जास्त पाण्याचा वापर केल्यास..
लागवडीनंतर कॉलर रॉट येण्याची कारणे -
नर्सरींमधूनच कॉलर रॉटची लागण असलेले रोप लागवड केल्यास ते खोडाजवळ काळे पडते आणि मरते..
खोलवर लागवड असल्यास नाजूक खोडाची साल भिजते व अल्टरनेरियाला मध्ये शिरण्यास जागा मिळते..
लागवडीनंतर बेडमध्ये किंवा आपल्या पिकाच्या वाफ्यामध्ये एकसारखा ओलावा राहिल्यास..
एकसारखा पाऊस असल्यास..
खुपवेळेस एकसारखे धुके पडत असल्यास..
सलग एकामाघे एक टोमॅटो पिकाची लागवड असल्यास..
जुन्या पिकाचे अवशेष आपल्या जमिनीमध्ये तसेच असल्यास..

Posted on: 7/26/2019 3:12:41 PM