FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

अर्ली किंवा लेट ब्लाइट येऊ नये म्हणून करावयाची कामे. / Early & Late Blight Preventive Measures.

P P Pardeshi -
१. जुन्या पिकाचे अवशेष कि ज्या वर अर्ली किंवा लेट ब्लाइट ची लागण होती ते पूर्णपणे शेतातून साफ करूनच नवीन लागवड करावी.
२. अश्या वातावरणात आपले झाड बळी पडू नये म्हणून शक्यतो सकाळीच पाणी द्यावे जेणेकरून पीक जास्त का ओला राहणार नाही.
३. शक्यतो ड्रीपचा वापर करावा जेणेकरून पाने, फांद्या ओले होणार नाही.
४. मल्चिंग पेपरचा गरजेनुसार वापर करावा म्हणजे जमिनीतून येणारे इन्फेक्शन खालच्या पानावर येणार नाही.
५. तणांवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून रोगाची सुरवात तणांच्या बियांवर होते तो होणार नाही.
६. तीन वर्षातून एकदा तरी फुलपिके जसे झेंडूची आपल्या शेतात लागवड करावी.
७. अश्या पावसाळी दमट वातावरणात खूप बारकाईने प्लॉट मध्ये लक्ष ठेवावे, अडचण आढळ्यास लगेचच स्पॉट अप्लिकेश करावे.
७. दोन बेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
८. हवा खेळती राहण्यासाठी गरजेनुसार पाने फांद्या ट्रिम किंवा कमी करावी, त्याची सुरवात जुन्या पानांपासून करावी.
९. रासायनिक औषधे अर्ली ब्लाइट - azoxystrobin, pyraclostrobin, Bacillus Subtilis, Chlorothalonil, copper, hydrogen dioxide, mancozeb, potassium bi carbonate (PBC) , ziram, PSM etc.
१०. रासायनिक औषधे लेट ब्लाइट - mandipropamid, chlorothalonil, fluzinam, Bacillus Subtilis, triphenyltin, mancozeb, copper, PBC, potassium salt of phosphonic acid, oxathiapiprolin, PSM etc.

Posted on: 7/23/2019 2:30:00 PM